शरद पवार या जिल्ह्यात घेणार पहिला मेळावा, कारणही तसच

ब्युरो टीम : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला कार्यकर्ता संवाद मेळावा अहमदनगर जिल्ह्यात होत आहे. रविवारी (१० जुलै) शरद पवार नगरला येणार आहेत.
औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना पवार उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादला जाताना ते नगरमध्ये थांबणार आहेत. रविवारी १० जुलैला सकाळी साडे अकरा वाजता नगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हेही या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत. आतापर्यंतच्या राजकारणात पवार यांनी नगर जिल्ह्याला विशेष महत्व दिल्याचे आढळून येते.
दरम्यान,  आतापर्यंतच्या राजकारणात पवार यांनी नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजपने नगर जिल्ह्याची जबाबदारी यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविली आहे. अलिकडेच नगरच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा आपण लवकरच नगरला येणार असल्याचे फडणवीस यांनी त्यांना सांगितले होते. त्याआधीच आता पवार नगरला येत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने