ब्युरो टीम:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ३७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
व्यतिरिक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील भूमिहिन लोकांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बेघर आणि भूमिहिन लोकांना हक्काचं घर मिळणार आहे.
लोणार सरोवर जागतीक पातळीवरील पर्यटन स्थळ असून मागील अनेक दिवसांपासून याच्या संवर्धनासाठी निधीची मागणी होत होती. आज ती मागणी मान्य झाली आहे.
.... अनिरुद्ध तिडके
टिप्पणी पोस्ट करा