सोनिया गांधी हजर रहा, ईडीने पाठवले समन्स

        ब्युरो टीम : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. २१ जुलै रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. 

        दरम्यान,  या अगोदर नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी  यांचीही सहा दिवस ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात निर्देशने करण्यात आली होती. जंतरमंतरवर काँग्रेस आंदोलन करण्यात आले होते. तसेच दिल्ली पोलीस काँग्रेस नेत्यांसोबत गैरव्यवहार करत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यातच आता सोनिया गांधी यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.   

विशेष म्हणजे, या अगोदरही सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ईडीला पत्र लिहून त्या पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ईडीनेही ही मागणी मान्य करत सोनिया गांधी यांना चार आठवड्यांचा कालावधी दिला होता. हा कालावधी २१ जुलैरोजी संपत असल्यामुळे ईडीने त्यांना पुन्हा चौकशीचे समन्स बजावले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने