संजय राऊतांची ८ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू



ब्युरो टीम : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मागील ८ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. आज दुपारी बारा वाजता ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते.

दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, राज्यात चाललेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानुसार संजय राऊतांना १ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ईडीच्या समन्सनुसार आज दुपारी १२ वाजता संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरूच राहू शकते, अशीही माहिती मिळत आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने