नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार; निवडणुकांच्या तारखा जाहीर


 मुंबई : राज्यात राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आता नगरपरिषदांच्या निवडणुकांचा देखील धुरळा उडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आता राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसणार आहेत.

         राज्यातील सध्या राजकीय परिस्थिती पाहता राजकीय पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहताना दिसत आहे. अशातच आज राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये कोण धुराळा उडवणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

        आजच विधानभवनात विधान परिषदेच्या निवडणुकीतील दहा विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादी,  आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर काॅंग्रेसच्या एका नेत्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपच्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय, तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांनी शपथ घेतली. तर शिवसेनेकडून सचिन आहेर आणि आमाश्या पाडवी तर काॅंग्रेसकडून भाई जगताप यांनी शपथ घेतली आहे.

      दरम्यान,  या निवडणुकांसाठी उमेदवारांना 22ते 28 जुलै रोजी अर्ज उपलब्ध होणार असून त्याच अवधीत अर्ज स्विकारलं जाणार आहेत. तर 29 जुलै रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे. तर 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने