ब्युरो टीम: जळगावमध्ये रेल्वे अपघाताची मोठी घटना टळली आहे. धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे अर्धे डब्बे सोडून पुढे गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळही घटना घडली आहे. पाटलीपुत्र एक्स्प्रेस स्टेशनवरून निघाली होती. मात्र, काही अंतर दूर गेल्यानंतर अचानक रेल्वेचे अर्धे डब्बे सोडून इंजिन पुढे गेली. पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे अर्धे डब्बे मागेच राहिले. तर इंजिनसोबत अर्धे डब्बे पुढे गेले होते. रेल्वे दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. त्यानंतर लोकोपायलटने रेल्वे एक्स्प्रेस थांबवली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, मुंबईमध्येही लोकल अपघात घडला होता. सीएसएमटी रेल्वे स्थानकात लोकल रेल्वेचा डब्बा रुळावरून घसरला होता. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. अखेरीस 3 तासांच्या प्रयत्नानंतर रेल्वे सेवा पुर्वपदावर आली आहे.
ऐन पावसाळ्यातही सुरळीतपणे सुरू असलेली नवी मुंबईची हार्बर लोकल सेवा अचानकपणे ठप्प झाली. सीएसटीएम स्थानकामधून वाशीकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला होता. रुळावरून लोकल घसरल्यानंतर बफरला जाऊन धडकल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे सीएसएमटी ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती. फक्त वाशी ते पनवेल मार्गावर फक्त रेल्वे सेवा सुरू होती. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
टिप्पणी पोस्ट करा