फडणवीस यांच्याकडे येणार गृहखाते ? या फोटोनंतर सुरूय चर्चा

ब्युरो टीम : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता राज्याचे गृहखाते फडणवीस यांच्याकडे  येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण असेल आणि कोणाला कुठली खातील मिळतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. पण मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागू शकते याच्या चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत. बंडखोर शिवसेना आमदार आणि माजी मंत्र्यांची पुन्हा वर्णी लागू शकते असं बोललं जातंय. तर खात्यांबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातंही होतं. यामुळे आताच्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही फडणवीसांकडेच गृह खातं असेल, अशी शक्यता आहे. त्यातच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट म्हणजे फडणवीस यांच्याकडे गृह खातं असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने