तुमचे जीमेल अकाउंट तुमच्याशिवाय इतर कोणी वापरत नाही ना ?

ब्युरो टीम : आपण एक किंवा त्यापेक्षा जास्त स्मार्टफोन, लॅपटॉपवर जीमेल अकाउंटने लॉग इन करत असतो. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉगइन करण्यासाठी लोक जीमेलचा वापर करतात. त्यामुळेच तुमचे जीमेल अकाउंट तुमच्याशिवाय दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून तर वापरले जात नाही ना, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते कसं ओळखायचे, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 
जीमेल ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. तुमच्यापैकी अनेकांकडे जीमेल आयडी असेल. भारतात सायबर सिक्युरिटी आणि प्रायव्हसीबद्दल जागरूकता फारच कमी आहे. सर्वसाधारणपणे जीमेल अकाउंटसोबत इतर अनेक अकाउंट लिंक केलेली असतात. तुम्ही तुमच्या जीमेलसोबत किती तरी पासवर्ड सिंक ठेवत असता. त्यामुळे जर तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले, तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. तुमच्या जीमेल आयडीवरून अनेक अकाउंट हॅक होऊ शकतात. म्हणूनच जीमेल अकाउंटची सिक्युरिटी आणि जागरूकता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काहीवेळा असे होते की दुसरे कोणीतरी तुमचे जीमेल अ‍ॅक्सेस करत असते. पण खरी समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा दुसरे कोणीतरी तुमचे जीमेल  अ‍ॅक्सेस करत आहे, आणि तुम्हाला त्याची माहिती नाही. चला तर मग आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सहज कळेल की तुमचे जीमेल अकाउंट तुमच्याशिवाय इतर कोणी अ‍ॅक्सेस करत तर नाही ना?

हे लक्षात ठेवा

- तुमच्या गुगल अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही आतापर्यंत किती डिव्हाइसेसवरून जीमेल अ‍ॅक्सेस केला आहे, याचा रिव्ह्यू करा. त्यानंतर तुमच्या गुगल अकाउंटमध्ये नेव्हिगेशन पॅनेलमधून Security पॅनेलवर जा.

-  Security पॅनेलमध्ये Manage Devices चा ऑप्शन असेल. येथे क्लिक करून, तुम्ही एकाच वेळी किती डिव्हाइसेसवरून लॉग इन केले आहे, ते तुम्हाला दिसेल. अधिक तपशीलासाठी, तुम्ही लिस्टमधून डिव्हाइस निवडू शकता.

-जर तुम्हाला या लिस्टमध्ये असे कोणतेही डिव्हाइस दिसले, ज्यातून तुम्ही लॉग इन केलेले नाही, तर समजून घ्या की कोणीतरी तुमचे अकाउंट  अ‍ॅक्सेस करत आहे. चांगली गोष्ट म्हणजे येथून तुम्ही त्या डिव्हाइसमधून साइन आउट करून तुमचा जीमेल काढून टाकू शकता.

- तुमचे जीमेल खाते कुठून लॉग इन केले जात आहे, हे पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे. जर तुमच्याकडे कॉम्प्युटरवरून जीमेल लॉगिन असेल, तर जीमेल फ्रंट पेजवर स्क्रोल करून पेजच्या तळाशी जा.

- पेजच्या खाली उजव्या बाजूला Last account activity: XX Minutes ago दिसेल. त्याच्या खाली Details वर क्लिक करा. क्लिक केल्यावर, एक नवीन विंडो दिसेल. येथे तुमच्या अकाउंटच्या  अ‍ॅक्टिव्हिटीची लिस्ट असेल.

- सर्वात वर Concurrent Session Information दिसेल. येथे ब्राउझरचे नाव आणि लोकेशन आयपी अड्रेस पाहता येईल. त्याच्या खाली एक टेबल दिसेल जिथे आयपी, लोकेशन आणि लॉगिन तारीख व वेळ असेल.

- आता तुम्ही काळजीपूर्वक पहा. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही जे लॉगिन सेशन पाहत आहात, ते तुम्ही केले नाही, तर समजून घ्या की तुमचे जीमेल अकाउंट इतर कोणीतरी  अ‍ॅक्सेस केले आहे.

-तुम्ही येथून साइन आउट देखील करू शकता. याशिवाय, आयपीच्या मदतीने, कोणत्या लोकेशनहून  अ‍ॅक्सेस घेतला आहे,हे देखील शोधता येते. लक्षात ठेवा, हॅकर्स आयपी बाउन्स करण्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात, त्यामुळे आयपीवरून योग्य ठिकाण जाणून घेणे शक्य होत नाही.

- पण तुम्ही जीमेल च्या Security Check Up ऑप्शन टॅप करून अधिक माहिती मिळवू शकता आणि तुमचे अकाउंट सुरक्षित करू शकता.

जीमेलचा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना तर कामानिमित्त दररोज जीमेलचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्याचा वापर सुरक्षित पद्धतीने कसा करता येईल, याची काळजी घ्यावी. जीमेल जर हॅक झाला तर मोठे नुकसान होऊ शकते

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने