'आनंदोत्सव' चा पुरस्कार हा सामाजिक संस्कार : विजय कुवळेकर

ब्युरो टीम : संकटे आली तरी जीवन कधी थांबत नाही जीवन प्रवाही असते. गतिमान असते. आणि ते थांबताही कामा नये. जीवन थांबू नये , प्रवाही राहावं, निकोप राहावं, अर्थपूर्ण व्हावं आणि सर्वांच्या कल्याणाच व्हावं याच्यासाठी काही माणसं झटत असतात, आजचे सर्व पुरस्काराचे मानकरी हे त्यांचे प्रतिनिधी आहेत. जीवनाचे प्रश्न सोपे नसतात. आजच्या काळात  वैज्ञानिक प्रगती होते आहे पण नैतिक अधोगती जास्त होते आहे . अशावेळी आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा हा एक सामाजिक संस्कार असतो असे प्रतिपादन जेष्ठ संपादक, विचारवंत, साहित्यिक, कवी गीतकार, पटकथाकार, अभिनेते तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त  विजय कुवळेकर यांनी केले. 
आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत, संख्या शास्त्र व संगणक तज्ञ  प्रा. डॉ. एम एस बागवान हे होते. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कोरोना महामारीचे आरिष्ट्य दूर होताच संस्थेच्या वतीने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. २०१९ आणि २०२० या कालावधीत निवडण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अमृतमहोत्सवी वाटचालीमुळे या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला होता.  
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या विश्वस्त सौ उषा सहस्रबुद्धे यांनी केले. चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी प्रमुख पाहुणे आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला. 
ते म्हणाले की कोरोना नंतर २ वर्षांनी आपण एकत्र येत आहोत या काळात अनेक संकटांचा आपण सामना केला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना याच वर्षात हा पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे . आनंदोत्सव ट्रस्ट दरवर्षी पुरस्कार ज्यांना द्यायचा आहे त्यांची निवड करताना कुणाकडूनही अर्ज, शिफारस किंवा प्रस्ताव घेत नाही. तर समाजात वावरत असताना स्वतः बरोबरच समाजोन्नती साठी अहोरात्र भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शोध संस्था घेते आणि त्यांचा गौरव करते. आज ज्यांना पुरस्कार दिला आहे ती माणसे ही त्यांच्या क्षेत्रात महान तर आहेतच . त्यांनी स्वतःपासून समाज कार्याला सुरुवात करून त्याच्या विश्वात मोठा नावलौकिक मिळवला आहे . या व्यक्ती संस्थात्मक पातळी बरोबरच व्यक्तिगत स्तरावर समजोद्धारचे  कार्य करीत आहेत. त्यांना पुरस्कार देणे हे संस्थेच्या रचनात्मक कार्याचा भाग आहे असे मी मानतो . आगामी काळात आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट संपूर्ण सनातन साहित्य संग्रह करून अकोले इथे  भव्य साहित्य संशोधन केंद्र ग्रंथालय आणि अभ्यासिका साकारून रचनात्मक कार्याला गती देणार आहे . 
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. सन २०१९ दुर्गा माता स्त्री शक्ती पुरस्काराने आदिवासी भागात स्त्री सबलीकरण व स्त्री शिक्षण याचे भरीव कार्य करणाऱ्या सरपंच ते जिल्हा परिषद सभापती पदापर्यंत झेप घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सिंधुताई उंबरे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय होते. 

यानंतर अनाथांना स्वयंभूपणे सनाथ होण्यासाठी यज्ञ मांडणाऱ्या स्वत:च्या  अनाथपणावर मात करून , अनाथांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या अमृता करवंदे यांना 2020 चा शारदा दुर्गा स्त्री शक्ती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्यासोबत आलेल्या आनंदोत्सव च्या विश्वस्त स्फूर्ती देशपांडे भाई सथ्थ नाईट स्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे   गाडगीळ सर यांना मंचावर पुरस्कार ग्रहण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते  .
 स्त्री शक्तीचा सन्मान करण्याच्या या मालिकेत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या सारिका दातखीळे हीचा सन्मान झाला. 
 समारंभात सन २०१९ चा प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जगविख्यात चित्रकार तथा शिल्पकार प्रमोद कांबळे यांना प्रदान करण्यात आला यावेळी त्यांच्या पत्नी सौ  स्वाती कांबळे उपस्थित होत्या. 
२०२० चा प्रज्ञावंत गौरव पुरस्कार स्नेहालयाचे संस्थापक, स्वयंसेवक, कार्यकर्ते, मार्गदर्शक, सामाजिक विचारवंत प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांना देण्यात आला त्यांच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख हे होते. 
हरिभक्त परायण भागवताचार्य अशोकानंद महाराज यांना 2019 चा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी आईसाहेब कर्डिले यांचा देखील यावेळी सन्मान झाला. 
२०२० चा जीवन गौरव पुरस्कार नगर मधील ज्येष्ठ अर्थतज्ञ अर्थव्यवहार क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व सिंधी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्राध्यापक चंद्रभान मध्यान यांना सपत्नीक  देण्यात आला . 
श्रीफळ  गुलाब पुष्प गौरव चिन्ह गौरव पत्र आणि महा वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रत्येक पुरस्कार वितरित करताना गौरव पत्राचे वाचन करण्यात आले. 
सत्काराला उत्तर देताना सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी सामाजिक कृतज्ञता पर विचार व्यक्त केले. 
या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि गौरव पत्राचे वाचन अनिल सोमण यांनी केले. 
नंतर अध्यक्ष प्रा. डॉक्टर एम एस बागवान यांचे भाषण झाले. प्रा. डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर यांनी केले तर आभार विनायक पवळे यांनी मानले कार्यक्रमाचे सांगता कुलकर्णी तिच्या पसायदान गायनाने झाली.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने