घरांवर, आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकवावा, केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे आवाहन


ब्युरो टीम : 'नागरिकांनी घरांवर, आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकवावा,' असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल, रविवारी अहमदाबाद येथे केले. 
जल योजनेचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान, तिरंगा मोहीम राबवण्याचा निर्धार केला आहे. लहान मुले व तरुणांमध्ये देशाच्या स्वातंत्र्याविषयी, विकासाविषयी जागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याची, राष्ट्रप्रेम जागवण्याची ही संधी आहे. देशभरात २० कोटींहून अधिक ध्वज मोहिमेत फडकावले जातील, असे अनुमान आहे.
दरम्यान, दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरचे प्रशासन नागरिकांना राष्ट्रध्वज घेण्याची सक्ती करीत असल्याचा आरोप पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी केला. त्यांनी या बाबत एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी ध्वनिवर्धकावरून व्यावसायिकांना ध्वजखरेदीबाबतचे आवाहन केले जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने