काळजी घ्या! पुढील काही दिवस महत्वाचे


ब्युरो टीम : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याची माहिती दिलीय. होसाळीकर यांनी पश्चिम किनारपट्टीचे उपग्रहांच्या माध्यमातून काढलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत होसाळीकर यांनी किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलीय.
'५ जुलै, सकाळी साडे नऊ वाजताची ही परिस्थिती आहे. पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच दक्षिण गुजरातपासून ते अगदी केरळपर्यंत ढगांची चादर दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा तर काही निवडक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे,' असं होसाळीकर म्हणालेत. तसेच पुढे त्यांनी थेट प्रदेशांची नावं घेऊन या परिस्थितीचा परिणाम नेमका कोणत्या प्रदेशांवर होऊ शकतो याचा अंदाज व्यक्त केलाय. 'कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट या भागांमध्ये या परिस्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे,' असं होसाळीकर म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने