मुंबईत मुसळधार, जनजीवन विस्कळित


ब्युरो टीम : मुंबईत दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना आहेत. अशात आता जास्त पाणी पडल्याने मुंबईत अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. सायन, बोरिवली, कांदिवली इथेही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची नोंद आहे. पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग बंद करावा लागला आहे.
पावसामुळे मुंबईची अवस्था बिकट आहे. सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. अशात हवामान खात्यानेही पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफच्या पाच तुकड्या दाखल केल्या आहेत.
दरम्यान, अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने