भाजपा नेते मोहित कम्बोज यांचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल


ब्युरो टीम : भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी  ठाकरे सरकारला “३० जून माझी तारीख असेल, १ जुलै उजाडू देणार नाही” असा इशारा दिला होता. मोहित कम्बोज यांनी दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरल्याने आश्चर्य व्यक्त आहे. तर दुसरीकडे त्यांना या सर्व घडामोडींची आधीच कल्पना होती का? असाही संशय व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी २९ जूनच्या रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने सरकार अल्पमतात आलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पदाचा त्याग केला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान भाजपा नेते मोहित कम्बोज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये “मला ना अपमानाची भीती आहे, ना सन्मानाची इच्छा आहे. ही लढाई सुरु राहणार आहे. ज्यांनी हे सर्व रचलं आहे त्यांना सांगतो, १ जून तारीख तुमची होती, ३० जून तारीख माझी असेल. १ जुलै उजाडू देणार नाही. मीडियाकडून हे ऐकून घ्या. महादेवाची शप्पथ घेतो, मीदेखील उत्तर भारतीय आहे,” असं मोहित कम्बोज म्हणाले असल्याचे दिसतंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने