ब्युरो टीम : दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांत मागील २४ तासांत मुसळधार पावसाने तडाखा दिला. अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांनी प्राण गमावले. यापैकी नऊ जणांचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला आहे. या पावसाळ्यात आत्तापर्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कच्छ, नवसारी आणि डांग जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्ग बंद झाले. त्याखेरीज ५१ राज्य महामार्ग व ४०० पंचायत रस्त्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.
दरम्यान, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र भागातील जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा 'रेड अॅलर्ट' दिला आहे.
तसेच देशांत अनेक अन्य राज्यांतही पावसाचा कहर सुरू आहे. तेलंगणमध्ये पावसाची संततधार कायम असून राज्य सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना येत्या शनिवारपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यांनादेखील मुसळधार पावसाने झोडपले आहे.
टिप्पणी पोस्ट करा