सर्वसामान्यांना महागाईचा चटका! स्वयंपाकाचा गॅस महागला


ब्युरो टीम : भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिलाय. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आलेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीसंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
आज पासून १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.
दरम्यान, गेल्या एका वर्षात घरगुती सिलेंडरचा दर ८३४.५० रुपयांवरून आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडरच्या दरात १९ मे २०२२ रोजी ४ रुपयांची शेवटची करण्यात आली होती. यापूर्वी ७ मे रोजी दिल्लीत ९९९.५०रुपये प्रति सिलेंडर दर होता. ७ मे रोजी एलपीजी सिलेंडर २२ मार्च २०२२ रोजी ९४९.५० रुपयांच्या तुलनेत ५० रुपयांनी महागला. २२ मार्चलाही सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी, ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर ८९९.५० रुपये होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने