‘या’ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; शिवसेनेचा गद्दारांना दणका


ब्युरो टीम
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंड केल्यानंतर अनेक शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी झाले, काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यापार्श्वभूमीवर पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गद्दार शिवसैनिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांनी शिंदे यांना जाहीर पाठींबा दिला. या दोन्ही नेत्यांवर कारवाई करत शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. विजय चौगुले हे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. तसेच विजय नाहटा हे राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत.पक्षविरोधी कारवाया केल्याने दोन्ही नेत्यांना पक्षातून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला.
शिवसेनेने या दोन्ही नेत्यांवर केलेल्या कारवाई संदर्भात सामना वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आले आहे. आता अर्जून खोतकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समोर येत आहे. शिंदे गटात सहभागी होत आमदार-खासदारांसोबत आता स्थानिक नेतेही उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने