राज्य कृषिमंत्र्यांच्या दोन दिवशी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

  


      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तभारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्याकृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने14-15 जुलै2022 रोजी बेंगळुरू येथे राज्य कृषी आणि फलोत्पादन मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमरकृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कैलाश चौधरी आणि राज्यांचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.

      डिजिटल शेतीप्रधानमंत्री पीक विमा योजनानैसर्गिक शेतीशेतकरी उत्पादक संघटनाई- राष्ट्रीय कृषी बाजारपेठ ई- नाम  प्रधानमंत्री किसान सन्मान निधीराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानकृषी पायाभूत सुविधा निधीभारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे नवीन तंत्रज्ञान यासारख्या नऊ विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत परिषदेदरम्यान तांत्रिक सत्रे आयोजित केली जातील. परिषदेदरम्यान तांत्रिक सत्रांसोबतच देशभरातील विविध राज्यांमध्ये अवलंबलेल्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींवरील एक स्वतंत्र सत्र आयोजित केले जाईल. शेतकऱ्यांना कृषी मालाला चांगली किंमत मिळवून देण्याकरिता कृषी उत्पादनाच्या व्यापार आणि विपणनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांच्या हस्ते ई-नाम प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म्स सुरू करणे हा या परिषदेतील प्रमुख उपक्रम आहे.

      केंद्र सरकारने कृषी-उत्पादन विपणनातील पुढील स्तरावरील क्रांतीच्या दिशेने या "ई-नाम अंतर्गत प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म्स (PoPs)" द्वारे सर्व हितधारकांच्या सहभागासाठी एक अभिनव पुढाकार घेतला आहे ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन त्यांच्या राज्यांच्या सीमापार विकण्यास मदत होईल. यामुळे अनेक बाजारपेठाखरेदीदारसेवा पुरवठादारांपर्यंत शेतकऱ्यांची डिजिटली सुलभता वाढेल आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या चांगल्या किंमती मिळण्यासाठी किंमत शोध यंत्रणा सुधारण्याच्या उद्देशाने व्यापार व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली जाईल. प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म्स म्हणून ई -नाम कार्यक्षम आणि प्रभावी एक राष्ट्र एक बाजार परिसंस्था तयार करण्याचा मार्ग खुला करेल.

     ही परिषद ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या’निमित्त आयोजित केली जात असून आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने