'आता आदित्य फिरतोय. मीही पुढील महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडायचे आहे. बंडखोरांमध्ये हिंमत असेल, तर शिवसेनाप्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या हिमतीवर मते मिळवा. प्रत्येकाला आई-वडील हवेसे असतात. सुदैवाने ज्यांचे आई-वडील सोबत आहेत, त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्यात आणि मते मागावीत,' असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
'मनगटात ताकद ज्या शिवसेनेने दिली, ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. याचे कारण स्पष्ट आहे. त्यांच्या मागची जी ताकद आहे, महाशक्ती, कळसूत्री बाहुल्यांचे संचालक आहेत, त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरून आपला भगवा हटवायचा आहे आणि त्यांचा ठसा उमटवायचा आहे; पण ज्या-ज्या वेळी संकटे आली, त्यांना मातीत गाडून शिवसेना पुन्हा उभी राहिली,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा