या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकला बॉम्ब

ब्युरो टीम : केरळमधील कन्नूर जिल्ह्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आलाय. येथील पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
मंगळवारी ( १२ जुलै )  रोजी सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पय्यानुर पोलिसांनी दिलीय. या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. कार्यालयातील फर्निचरचंही नुकसान झाल्याचं कार्यालयामधील फोटोंमध्ये दिसत आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने