पावसाचा परिणाम लोकलवर!


ब्युरो टीम : मुंबई महानगराला सोमवारी पावसाने चांगलेच झोडपले. दुपारपासून पडलेल्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली.  त्यामुळे लोकल चालवताना मोटरमनला अडचणी येत असून  लोकलचा वेग मंदावला. दरम्यान, आज पहाटेपासूनही काही भागात पाऊस सुरू आहे.
मुंबईसह परिसरात पहाटेपासून पडत असलेल्या पावसाचा फटका काही प्रमाणात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला बसला आहे. लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू असल्याने कामावर जाणाऱ्यांना विलंब होत आहेत. काल, लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले होते. तीच परिस्थिती मंगळवारी मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे. पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकल पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही दहा मिनिटे विलंबाने होत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, विद्याविहार, सायन यासह काही स्थानकांच्या बाहेर, तर रुळांच्या आजूबाजूलाही पाणी साचले आहे. पाऊस दिवसभर सुरु राहिल्यास लोकल वेळापत्रक आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यातच, मंगळवारपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने