विधानसभेत सुद्धा , काय झाडी,काय डोंगार, काय हाटील


ब्युरो टीम :  विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी रविवारी विधिमंडळात मतदानप्रक्रिया पार पडली. यावेळी  'काय झाडी,काय डोंगार, काय हाटील'फेम आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. मतदान करण्यासाठी शहाजीबापू पाटील यांचा ११२ वा क्रमांक होता. ते जागेवर उभे राहताच सभागृहातील आमदारांनी एका सूरात 'काय झाडी,काय डोंगार, काय हाटील' असा डायलॉग म्हटला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे विधिमंडळातील पहिली लढाई ही तुर्तास भाजपने जिंकली आहे. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षाच्या व्हिपविरोधात मतदान केले, याची नोंद विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून घेण्यात आली. सभागृहाच्या पटलावर याची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने