मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज जाहीर होणार?


ब्युरो टीम:
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने घ्याव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे.

आज दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग 367 ठिकाणी निवडणुका जाहीर करेल किंवा पावसामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करेल किंवा काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका जाहीर करेल. तसेच आरक्षण जाहीर झालेल्या नगरपालिकांबाबत निवडणूक आयोगाकडून कोणत्या सूचना दिल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील ज्या नगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ती रद्द करून नवीन आरक्षण सोडले जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आजची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने