भाजप नेते मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांवर साधला निशाणा, म्हणाले...

ब्युरो टीम :  ‘इकडून तिकडे गेल्याने कोणी पराभूत होत नाहीत. जयंत पाटील तुम्ही इकडून तिकडे गेला नाहीत, म्हणून उपमुख्यमंत्री झाला नाहीत. आता मनामध्ये पक्का विचार ठेवा. कधीतरी अशी उडी मारावी लागते. राष्ट्रवादीतील अर्धे लोक रात्री आमची भेट घेतात. कधी कोणी इकडे येईल तुमच्यासकट सांगता येत नाही, असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला.
विधानसभा अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपदी काल, भाजपाचे राहुल नार्वेकरांचा विजय झाल्यानंतर आज बहुमत चाचणीतही फडणवीस-शिंदे सरकारचा विजय झाला आहे. यानंतर अभिनंदनपर भाषण करताना मुनगंटीवार यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. तसेच अजित पवारांचे आभार मानताना खोचक टीकाही केली. मुनगंटीवार म्हणाले, अभिनंदन विश्वसादर्शक प्रस्तावादरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये सत्ता गेल्याची वेदना आम्ही बघत होतो. मात्र, शिंदे आणि भाजपा सरकारची सत्ता आणण्यासाठी अजित पवारांनीही प्रत्यक्ष-अप्रत्य़क्षपणे मदत केली त्यामुळे त्यांचेही धन्यवाद, असा खोचक टोलाही मुनगंटीवारांनी लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने