ब्युरो टीम : 'गुरु पौर्णिमा', 'आण्णाभाऊ साठे स्मृतिदिन', 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती' व 'संत गोदड महाराज रथ यात्रा कर्जत' हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १३ ते २६ जूलै २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
नगरपंचायत व नगरपालिका निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अहमदनगर शहर व जिल्ह्यात या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात १३ जूलै ते २६ जूलै २०२२ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, सोटे तलवारी भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
हे प्रतिबंधात्मक आदेश आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत. त्यामध्ये शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, विहीत प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने आयोजित निवडणूक प्रचार सभा, सभा घेणेस अगर मिरवणूका काढणेस ज्यांनी संबंधीत प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींसाठी हे आदेश लागू राहणार नाहीत, असे ही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा