आणि सभागृहातच फडणवीसांनी शिंदेंना हात जोडले, कारण कळल्यावर तुह्मीही हसाल...

ब्युरो टीम : 'सगळं घडवणारे हे (फडणवीस) आहेत. कधी काय करतील कळत नाही. सगळी फिल्डिंग लावून राज्यसभेचे उमेदवार पडले. काँग्रेसने ४४ मतं घेतली, राष्ट्रवादीने ४३ घेतली. आमचा उमेदवार येईल असं वाटत होतं पण साला आमचा उमेदवारच पडला' असं सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हात जोडत, सगळं उघड करु नका असं म्हटलं. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.
शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी बोलताना शिंदेंनी शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार आणि एकंदरीत सर्वच सत्ता नाट्यावर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करत असताना वेळोवेळी कसं मागे पडतो गेलो, याचंही स्पष्टीकरण दिलं आहे. इतकंच नाहीतर यावेळी साला या शब्दावरुन सभागृहात जोरदार हशा झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो शब्द मागे घेतला. 
दरम्यान, यावेळी निधी वाटपाची एक चिठ्ठी एकनाथ शिंदेंना मिळली. ती चिठ्ठी फेकत हा विषय संपला असं शिंदे म्हणाले. यावरूनही सभागृहात सगळे जोरदार हसले. खरंतर, अनेक दिवसांची खदखद आज मुख्यमंत्री बोलून दाखवत आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवर अजित पवारांनाही चिमटे काढले. ते म्हणाले की, 'सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. सर्व आमदारांना हे माहिती आहे. पण अजित पवार का इतर कोणी विरोध केला. आम्हाला सांगण्यात आलं की, ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. मी ठीक आहे म्हटलं. मी कधीही कोणत्याही पदाची लालसा केली नव्हती, कधी बोलणारही नाही. पण एकदा अजित पवार बोलता बोलता इथे पण अपघात झाला आहे असं बोलून गेले. मी बाजूला नेऊन विचारलं असता आमचा कोणाचा विरोध नाही, तुमच्या पक्षाचा निर्णय होता असं सांगितलं.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने