महाराष्ट्र मध्ये सर्वदुर पाऊस, ठाणे जिल्यात मुसळधार.

महाराष्ट्र मध्ये सर्वदुर पावसाने जोरदार हजेरी लावली असुन, ठाणे शहरामध्ये गेल्या ४८ तासांत ५५.६० मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. वृक्ष कोसळणे, संरक्षण भिंतींची पडझड, पाणी साचल्याच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सुरू होता. या घटनांची तत्काळ दखल घेऊन त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पावले उचलली जात होती. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरसह ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले.
           ठाणे शहरामध्ये सोमवारी सुमारे १२३.४३ मिमी पाऊस पडला असून मध्यरात्री आणि मंगळवारी सकाळीही शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. पहाटे ३.१५ च्या सुमारा कळवा खारेगाव येथील पारसिक नगर बुबेरा चाळीजवळ पाणी साचले होते. या तक्रारीची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून त्यांनी वॉटर पंपच्या सहाय्याने येथील पाणी बाहेर काढले. मंगळवारी सकाळी ८ पर्यंत शहरात पाच झाडे पडल्याची, सहा फांद्या कोसळल्याची, एक झाड धोकादायक झाल्याच्या तक्रारीसह दोन ठिकाणी संरक्षण भिंत कोसळल्याच्या आणि १० ठिकाणी पाणी साठल्याच्या तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे करण्यात आल्या.
           कोपरी बारा बंगला, बाळकूम, तुळशीधाम, मानपाडा, पाचपाखाडी, कळवा, नौपाडा, वागळे इस्टेट, मानपाडा, कासारवडवली, लुईसवाडी, हरिनिवास सर्कल, घोडबंदर रोड, वृंदावन सोसायटी या भागांमध्येही झाडे कोसळल्याच्या तसेच धोकादायक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन धोकादायक झालेल्या वृक्षांना हटवण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने