मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींना भेटणार, कुठल्या विषयावर होणार चर्चा?

    


ब्युरो टीम:राज्यात सत्तांतर झाल्यानतंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. ही बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती आणि या भेटीत राज्यमंत्रिमंडळ विस्ताराबाबतआणि कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींसोबत देखील याच मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.                                                                          शिंदे-फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीचे काही फोटो देखील शाहांनी ट्वीट केले आहेत. तसेच ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.                                                                                                                                           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारपासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज ते संरक्षणमंत्री राजनात सिंह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आषाढी वारीच्या निमित्ताने शासकीय पुजेसाठी ते दिल्लीहून थेट पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. रविवारी आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने