शरद पवार शिवसेना संपवत आहेत , गिरीश महाजनांचे मोठ वक्तव्य...

 


ब्युरो टीम:
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन  यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर खुल्या मनाने प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन म्हणाले, २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजप-शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री राहील असा कुठलाही निर्णय झाला नव्हता. त्याचा मी साक्षीदार आहे. निकाल लागल्यावर मी फडणवीसांना भेटलो. मातोश्रीवर फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे  अनेक सभांमध्ये होते. त्यावेळी त्यांनी अडीच वर्षे आमचा मुख्यमंत्री राहील असे कधीही बोलले नाही. शाह बोलत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मुख्य म्हणजे शरद पवार यांच्याशी त्यांचे आधीपासूनच सेटिंग झाले होते. ठाकरेंच्या बोलण्याला कोणताही आधार नाही. पण, शरद पवार यांना शिवसेना संपवायची होती. त्यांना माहिती होतं की ते मुख्यमंत्री झाले की सेना संपली. पवारांना माहिती होत ठाकरे यांना कोणती नगरपालिका माहिती नाही, आणि ते त्यांनी साध्यही केले, असेही गिरीश महाजन म्हणाले.

          देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्याबाबत गिरीश महाजन म्हणाले, मला वाटत नाही ते नाराज होते. ते सरकारच्या बाहेर राहणार हे आधीच ठरले होते. पण पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने उपमुख्यमंत्री होणे आम्हाला योग्य वाटले नाही. पण पंतप्रधानांचे फोन आले. हा निर्णय राज्याच्या हितासाठी त्यांनी घेतला. देवेंद्र फडणवीस अडीच वर्षे पक्ष संघटना वाढवणार होते. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल गिरीश म्हणाले, ती तांत्रिक बाब आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांना सन्मान मिळाला असता. किरीट सोमय्यांवर मात्र महाजन यांनी बोलण्याचे टाळले.                                                                                                                                                                                                                                                              शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडणे ही मोठी गोष्ट आहे. संजय राऊत हे नेहमी शिव्या देत असतात. वास्तविक पाहता मी आधीच सांगितले होते की, संजय राऊत यांना सेना संपविण्याची सुपारी दिली आहे. ते ते बेछुट बोलायचे. त्याला त्यांचे लोकही कंटाळले आहेत. आता देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. ते ठरवतील. जे काही होईल ते योग्य होईल. हे डबल इंजिनचे सरकार आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने