ऑनलाईन निबंध स्पर्धा स्पर्धेचे आयोजन, प्रथम विजेत्यास मिळणार ५००० चे पारितोषिक.

ब्युरो टीम : अहमदनगर येथील कॉलेज कट्टा यांच्या तर्फे ऑनलईन निबंध स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन हि स्पर्धा यासाठी BVM PE यांनी प्रायोजीत केली आहे. ऑनलाईन होणाऱ्या या निबंध स्पर्धेच्या विजेत्यास पहिले पारितोषिक ₹ ५००० देण्यात येणार असून, या स्पर्धेमध्ये ₹ ३००० चे द्वितीय व ₹ २००० चे तृतीय पारितोषिक देखील दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी ५०० ते १५०० शब्द मर्यादा असणारा निबंध स्वीकारला जाणार असून यात ५ वी ते १२ वीचे विद्यार्थी स्पर्धक म्हणुन भाग घेऊ शकतात.


यासाठीचे विषय पुढील प्रमाणे आहेत.

 
१. मोबाईल शाप की वरदान
मुद्दे- मोबाईल वापराचे फायदे, तोटे, वेळ, इंटरनेटचा योग्य वापर.
२. मोबाईल गेम्स की मैदानी खेळ
मुद्दे - मोबाईल गेम आरोग्य, मैदानी खेळ, सध्याची स्थिती, पालकांचे मार्गदर्शन
या स्पर्धसाठी,स्पर्धक आपला ऑनलाईन निबंध २ जुलै पासुन ३१ जुलै २०२२ पर्यंत collegeCatta129@gmail.com या ईमेलवर जमा करू शकतात अधिक माहिती साठी स्पर्धक किंवा त्यांचे पालक 7020174876 या क्रमांकावर संपर्क करू शकतात

स्पर्धेत सहभागी होण्याचे नियम पुढील प्रमाणे आहेत
१. स्पर्धकाने A4 साईज कोऱ्या कागदावर निबंध लिहावा निबंधाच्या सुरवातीला विषयाचे नाव, स्पर्धकाने स्वतःचे पूर्ण नाव इयत्ता, पत्ता, शाळेचे नाव लिहावे. त्याचबरोबर स्वतःचे आधार कार्ड हे स्कॅन करून पाठवावे.
३. लिहलेला निबंध मराठी मध्ये टाईप करावा. यात देखील सुरवातीला विषय, स्वतःचे पूर्ण नाव, इयत्ता, पत्ता शाळेचे नाव टाईप करावे.
टीप -स्कॅन केलेला निबंध आणि आधार कार्ड हे एकाच pdf फाइल मध्ये सेव्ह करून पाठवावेत. स्कॅन करण्यासाठी (CamScanner) हे ॲप वापरू शकता. यासाठी पालकांची मदत घेऊ शकता
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन ज्योती क्रांती मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन श्री आजिनाथ हजारे व BVM PE चे CEO श्री अभिजीत हजारे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने