ब्युरो टीम: काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शिदें सरकरवर टीका अनेक प्रश्न उपस्थित केले होते, यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या टीकेला उत्तर देत त्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकरावर आरोप केला की, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातील कामावर स्थगिती आहे, त्या कामांवर कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. दादांसारख्या (अजित पवार) व्यक्तिनीतरी फाईलवर काय लिहीलंय. मी माझ्या हस्ताक्षरात लिहीलं आहे की, या कामाला स्थगिती देणं योग्य राहणार नाही, उलट या संदर्भात काय कामं हातात घेतलीयत, त्या कामांचं एक सादरीकरण माझ्या समोर आणि मुख्यमंत्रीमंत्र्यांसमोर करावं, त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचा देखील त्यात समावेश करता येईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मविआ सरकारच्या काळातील आदित्य ठाकरे यांच्या खात्याचा रिव्ह्यू केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलतना फडणवीसांनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांचे प्रोजेक्ट वगैरे काही नाही, शेवटी जेव्हा सरकारचं समर्थन संपलं तेव्हा सरकरने ४०० जीआर काढले. जीतका पैसा नाही त्यापेक्षा पाचपट पैसा वाटला. अशाने सरकारचा भट्टा बसेल, सरकारच्या तिजोरीवर भार पडेल, त्यामुळे रिव्ह्यू आम्ही करू. एकटं पर्यटन विभागाच्या विरोधात नाही. आदित्य ठाकरे यांचं खातं म्हणून नाही सगळ्यांचा रिव्ह्यू यावेळी केला जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मागणीला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पावसाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला आहे, याचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. एकदम हा निर्णय करावा लागतो. ,सर्व जिल्ह्यांचे सर्वेक्षण आमच्यापर्यंत पोहचत आहेत, त्याच्यावर आधारीत निर्णय आम्ही करू. अजितदादांच्या सरकारने जो निर्णय घेतला होता त्यापेक्षा चांगला निर्णय आम्ही घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा