मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी लागणार निवडणूक आयोगाची परवानगी; वेगळेच कारण आले समोर ....

 


ब्युरो टीम: : राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीला विठुरायाची महापूजा कोण करणार, याची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच  काही  दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने शिंदे यांनाच शासकीय महापूजेचा मान मिळणार असल्याचं स्पष्ट झालं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे.

        आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. मात्र राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यावर येता येणार आहे.

         विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.

        दरम्यान, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोग नेमक्या कोणत्या कार्यक्रमांना परवानगी देणार, यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून राहणार आहे. मात्र काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला अशीच आचारसंहिता लागू असताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजेस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनाही महापूजेची परवानगी मिळेल, अशी माहिती आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने