शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता ; धनुष्यबाण पक्ष चिन्ह हातून जाण्याची चिन्हे ?

  


ब्युरो टीम: राज्यात एकनाथ शिंदे  यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार गळाला लावले. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळे आणि शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाणही ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता आहे .
धनुष्यबाण चिन्ह गमावल्यास नव्या निवडणूक चिन्हाची तयारी ठेवा, अशा सूचना उद्वव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याची माहिती आहे. कमीत कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहचावं म्हणून कामाला लागा, असे आवाहनही ठाकरेंनी केले आहे. येत्या काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह पोहचवण्याचं आव्हान शिवसेनेपुढे आहेत.
ठाकरे सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे हे विधीमंडळ गटनेते होते . शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर त्यांना हे पद गमवावे लागले. मात्र एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता भर गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेते सुनील प्रभूंना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात सुरु असलेल्या मतभेदावर अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. आता उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण चिन्ह जाण्याची शक्यता आहे. याची जाणीव झाल्यानेच उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने