जपानच्या ज्या निवडणूक शिंजो आबे यांचा प्राण गेला, त्याचा निकाल लागला, वाचा नेमकं कोण जिंकले ?


ब्युरो टीम : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर ८ जुलै रोजी गोळीबार करण्यात आला होता. गोळाबारामुळं शिंजो आबे यांचं निधन झाले होते. जपानच्या नारा शहरात प्रचार करताना शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. शिंजो आबे हे जपानमधील लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा प्रचार करत होते. आबे ज्या हाऊस ऑफ काऊन्सिलरच्या निवडणुकीसाठी प्रचार करत होते त्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. एलडीपीनं या निवडणुकीत बहुमत मिळवलं आहे.
जपानच्या क्योदो या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या एलडीपी पक्षानं २४८ सदस्यांच्या हाऊस ऑफ काऊन्सिलर च्या निवडणुकीत यश मिळवलं आहे. पक्षाला वरिष्ठ सभागृहात ७५ हून अधिक जागांवर विजय मिळाला. एलडीपी आणि त्यांच्या आघाडीतील पक्ष कोमिटो एकून १६६ जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. एलडीपी कोमिटो आघाडीनं बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १६६ हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. २०१३ नंतर एलडीपीनं सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. जपानमधील प्रमुख विरोधी पक्ष संविधानिक डेमोक्रेटिक पार्टीचं संख्याबळ २३ वरुन घसरुन २० च्या खाली गेलं आहे.
जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी निवडणुका हा लोकशाहीचा पाया असतो, असं म्हटलं आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरु ठेवणार आहे, असंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने