ब्युरो टीम: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औंरगाबादहून आपला दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. ते दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या महिन्यातला सहावा दिल्लीचा दौरा असून ते समृद्धी महामार्गावरून ते विमानतळाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगबादला दौऱ्यावर होते. पूरग्रस्त भागाची पाहणी, शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी यासाठी ते दौऱ्यावर होते पण हा दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती आहे.
मागच्या एका महिन्यापासून राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्यामुळे विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले होते. शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा वाद कोर्टात असल्यामुळे विस्तार रखडल्याच्या टीकाही केल्या जात होत्या. त्यानंतर राज्यात दोनच मंत्री कारभार कसेकाय चालवतात अशाही टीका सरकारवर झाल्या आहेत. राज्यात दोन मंत्री असताना घेतलेले निर्णय हे अवैध आहेत असा आरोप काही विरोधकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पळापळ सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा