ब्युरो टीम : पिस्ता खाणे तुमच्या मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन तुमच्या त्वचेच्या समस्यादेखील दूर करतो, आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सक्षम असते. तसेच पिस्त्यामुळे तुमच्या मेंदूशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, तो मानसिक क्षमतेच्या विकासासाठीही खूप फायदेशीर आहे. ओनलीमायहेल्थ नुसार, पिस्त्याचे दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती , एकाग्रता वाढते. डोकेदुखी, सूज आणि जळजळ होण्याची समस्या कमी होते. पिस्त्याचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि तणावमुक्त वाटते.
रात्री दुधासोबत पिस्त्याचे सेवन केल्यास झोपही चांगली लागते. पिस्त्याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. यामध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन-ए, के, सी, बी-6, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, कॅल्शियम, मॅंगनीज आणि फोलेट असतात, जे मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. चला तर मग जाणून घेऊया पिस्त्याचे फायदे आणि खाण्याची पद्धत.
मेंदूसाठी होणारे फायदे
- अँटिऑक्सिडंट्स तणाव कमी करण्यास मदत करतात. पार्किंसंस किंवा अल्झायमरचे रुग्ण आणि न्यूरोलॉजिकल समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचे अँटिऑक्सिडंट्स अनेक समस्यांपासून संरक्षण करू शकतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळते, आणि तुमचा मेंदू निरोगी ठेवते. याशिवाय विसरण्याची समस्याही दूर करते.
- पिस्ता मेंदू आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनच्या मदतीने डोळे आणि मेंदूच्या मज्जातंतूंना आराम मिळू शकतो.
- मेंदूची एकाग्रता आणि क्षमता वाढवण्यासाठी पिस्त्याचे सेवन उपयोगी ठरते. यामध्ये आढळणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड तुमच्या मेंदूचे कार्य सुधारतात. तसेच सूज आणि दुखण्यापासून आराम मिळतो
- डोपामाइन तयार करण्यासाठी पिस्त्यातील व्हिटॅमिन बी 6 महत्वाचे आहे. डोपामाइन एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जो एकाग्रतेमध्ये मदत करतो. हे वृद्धावस्थेत मेंदूचे आरोग्य सुधारू शकते. व्हिटॅमिन ई अल्झायमर रोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.
- प्रथिने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, व नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.
पिस्ता कसा व केव्हा खाल ?
- पिस्त्याची साल काढून रोज सकाळी किंवा संध्याकाळी त्याचे सेवन करा.
- रेसिपीजसोबत गार्निश करून सुद्धा खाऊ शकता.
- सकाळी पाण्यात भिजवून खाऊ शकता.
- जर उच्च रक्तदाबाची तक्रार असेल, तर भाजलेले पिस्ते खाऊ नका.
- पिस्त्याचा हलवा बनवून खाऊ शकता.
हे लक्षात ठेवा
- मधुमेहाच्या रुग्णांनी पिस्त्याचे सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात करावे.
- डायरियाची समस्या असल्यास पिस्त्याचे सेवन केल्याने तुमची समस्या वाढू शकते.
- पिस्त्याचे जास्त सेवन केल्याने अॅलर्जी आणि खाज सुटणे, या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
पिस्ता खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने विविध फायदे होतात. पण त्याचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. योग्य प्रमाणात पिस्त्याचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा