भाजपचे दक्षिणायन यशस्वी होईल का? दिग्विजयासाठी दिलेत दक्षिणेतील चारही राज्यात राज्यसभा खासदार

       


 भारतातील सर्वांत शक्तिशाली राजकीय पक्ष म्हणून भाजपनं आपलं स्थान निर्माण केलंय. देशातला त्यांचा थेट प्रतिस्पर्धी मानला जाणारा कॉंग्रेस पक्ष रसातळाला गेलाय. तरी संपूर्ण भारतात कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाहीय. दक्षिणेतील राज्यांवर भाजपचा सुरुवातीपासून डोळा राहिला आहे. ती ताब्यात घेण्यासाठी वाजपेयी – आडवाणी असोत की मोदी- शहा

फक्त कर्नाटकात भाजपला यश आलंय

       १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. हिंदी पट्ट्यात भाजपला सहजजोडी. पूर्ण ताकदीनं यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी हेदेखील याच दिशेनं पावलं टाकताना दिसतात. ईशान्येकडील राज्यांची हीच परिस्थिती होती. मात्र सततच्या प्रयत्नांनी भाजपला तिथं मोठं यश मिळवून दिलंय. आता तिथं कमळ फुललं आहे. याच पद्धतीनं भाजपनं दक्षिणायन साठी मोहीम उघडली. यासाठी मोदी सरकारनं पहिलं पाऊल बुधवारी टाकलं. मोदी सरकारच्यावतीनं चार प्रतिष्ठित व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. सुप्रसिद्ध ऍथलिट  पी. टी. उषा, संगीतकार इलैयाराजा, समाजसेवी वीरेंद्र हेगडे आणि प्रसिद्ध पटकथा-लेखक-दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद. या चार चेहऱ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे की, ते सर्व दक्षिण भारतातील असून हे सेलिब्रिटी आहेत. अशा प्रकारे राज्यसभेवर उमेदवारी देण्याच्या बहाण्याने भाजप आपल्या ‘दक्षिणायन ’ला आणखी धार देण्याचा प्रयत्न करत आहे.


 दलित चेहऱ्यांना संधी

      भाजपनं यावेळी आपली शहरी आणि सवर्णाचा पक्ष असल्याची ओळख पुरती खोडत आणली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाचा पुरस्कार करत असल्याचा संदेश भाजप वारंवार देताना दिसत आहे. याच क्रमात त्यांनी केरळच्या पी. टी. उषा आणि तमिळनाडूच्या इलैयाराजा यांना उमेदवारी देऊ केलीय. विशेष बाब अशी की हे दोन्ही सेलिब्रिटी दलित आहेत. त्यामुळं भाजप दक्षिणेत उमेदवारी देत असतानाच तिथल्या ताकदवान आणि सुज्ञ दलित मतदारांना आपल्याकडं आकर्षित करू पाहात आहे. सोबतच कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिराचे प्रमुख म्हणून ओळखले जाणारे वीरेंद्र हेडगे आणि तेलंगणाचे सुप्रसिद्ध पटकथाकार विजेंद्रप्रसाद यांनाही भाजप राज्यसभेत पाठवत आहे. यामुळं दक्षिणेतल्या चारही राज्यांतील व्यक्तींना उमेदवारी देत आहे. विजेंद्र प्रसाद यांची भारतासह जगभरात ओळख निर्माण झाली आहे. बाहुबली ,आरआरआर आणि बजरंगी भाईजान सारख्या जगप्रसिद्ध सिनेमाचं त्यांनी लेखन केलं आहे. त्यामुळं त्यांची संपूर्ण भारतात ओळख निर्माण झाली आहे. त्यांना उमेदवारी देत भाजपनं त्यांची लोकप्रियता भाजपवाढीसाठी उपयोग येणार असल्याचे अंदाच बांधले आहेत.


दक्षिणेतील पाच राज्यांमध्ये १२९ लोकसभा जागा

       दक्षिणेत केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक ही पाच राज्ये आहेत. या पाच राज्यांमध्ये मिळून एकूण १२९ लोकसभेच्या जागा आहेत. यापैकी भाजपनं फक्त ३० जागा जिंकल्यात. पैकी २६ जागा एकट्या कर्नाटक राज्यातल्या आहेत. त्यामुळं आगामी काळात आपलं प्रभुत्व आणि बहुमत शाबूत ठेवण्यासाठी भाजपला दक्षिणेत जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत. म्हणूनच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादेत आयोजित करण्यात आली होती. येत्या काळात भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्यक्रम दक्षिणेतील राज्यांमध्ये आयोजित केल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे.

     आणि घवघवीत यश मिळालं. मात्र २०२२ उजाडलं तरी त्यांना दक्षिणेत अस्तित्व  निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. वारंवार उल्लेख केला जातो की, भाजप पुढची ३० वर्षे सत्तेत राहणार आहे. अमित शहा याच दिशेनं योजनेची आखणी आणि मोर्चेबांधणी करत असल्याचंही ऐकायला मिळतं. एकटं कर्नाटक आणि पॉंडेचेरी हा केंद्रशासित प्रदेश सोडला तर भाजपला दक्षिणेत यश आलेलं नाहीय. त्यामुळंच भाजप दक्षिणेत पक्षविस्तारासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे.


या लोकसभेसोबत  निवडणुकाही महत्त्वाच्या

      आंध्रप्रदेशात लोकसभेच्या २५ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला तिथं खातंही उघडण्यात यश आलं नाही. २०१४ मध्ये आंध्रप्रदेशात भाजपनं दोन जागा जिंकल्या होत्या. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप तिथं स्वतःची ताकद निर्माण करू पाहतंय. २०२४ लोकसभेनंतर लगेचच केरळ आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यांत भाजपला मुसंडी मारायची आहे. २०२४ मध्ये भाजपची नजर केरळमध्ये खातं उघडण्यावर असेल. केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत. तिथं हळूहळू भाजपला मताधिक्य वाढत असलं तरी या भगव्या पक्षावर विजयाचा गुलाल मात्र पडला नाहीय. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळं तिथं आपला जनाधार वाढवून राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. तिथल्या सत्ताधारी डाव्या आघाडीला तगडं आव्हान देण्यासाठी भाजपला मोठी तयारी करावी लागणार आहे.

       तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला तिथं एकही जागा जिंकता आली नव्हती. तमिळनाडू राज्य भाजपची धुरा सांभाळणारे युवा नेते के. अण्णामलाई यांच्याकडून भाजपला भरपूर आशा आहे. कर्नाटक केडरच्या आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. हा ३८ वर्षीय माजी आयपीएस अधिकारी तमिळनाडूमध्ये भाजपचा मजबूत केडर बेस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. इलैयाराजा यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने तामिळनाडूतच पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या प्रयत्नांना यश मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने