करा मोत्याची शेती, कमवा बक्कळ पैसा!


ब्युरो टीम : तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाची  माहिती देणार आहोत, जो करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसायासाठी सरकारकडून काही प्रमाणात सबसिडीही  उपलब्ध आहे. हा व्यवसाय कृषी क्षेत्राशी निगडीत असून तो म्हणजे मोत्याची शेती. ही शेती करून अनेकजण लखपती झालेत.
एक तलाव, शिंपले आणि प्रशिक्षण या तीन गोष्टी मोत्याची शेती करण्यासाठी आवश्यक आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वखर्चाने तलाव खोदून घेऊ शकता किंवा सरकार यासाठी काही प्रमाणात अनुदान देते, तुम्हीही त्याचा लाभ घेऊ शकता. शिंपले भारतातील अनेक राज्यांमध्ये आढळतात. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगाच्या शिंपल्यांचा दर्जा चांगला आहे. या शेतीबाबत प्रशिक्षण देण्यासाठी देशात अनेक संस्था आहेत. मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबई येथेही याबाबतचे प्रशिक्षण मिळू शकते.

अशी करा मोत्यांची लागवड

सर्वात प्रथम शिंपले एका जाळीत बांधून 10 ते 15 दिवस तलावामध्ये ठेवावेत,जेणेकरून ते त्यांना हवे तसे वातावरण तयार करू शकतील. त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाते, आणि त्यांची सर्जरी केली जाते. सर्जरी म्हणजे शिंपल्याच्या आत एक पार्टिकल किंवा साचा घातला जातो. या साच्यावर कोटिंग केल्यावर शिंपल्यावर थर तयार होतो, जो नंतर मोती बनतो.

लाखो रुपयांची कमाई

एक शिंपले तयार करण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका शिंपल्यातून दोन मोती निघतात, आणि एक मोती किमान 120 रुपयांना विकला जातो. दर्जा चांगला असेल तर 200 रुपयांपेक्षाही जास्त किंमत मिळू शकते. एक एकर तलावात 25 हजार शिंपले टाकण्यासाठी सुमारे 8 लाख रुपये खर्च येतो. अर्थात यापैकी काही शिंपले वाया गेले, तरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त शिंपले सुरक्षित राहतात. याद्वारे वर्षाला 30 लाख रुपये सहज कमावता येतात.

शेतकरी आता पारंपारिक पिकांसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. तो आता बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. मोत्यांची शेती कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देऊ शकते.त्यामुळे हा शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने