दिल्लीतही ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण; केंद्राकडून आढावा


ब्युरो टीम : केरळपाठोपाठ दिल्लीतही ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशातील ‘मंकीपॉक्स’ची रुग्णसंख्या चार झाली आहे.  ‘मंकीपॉक्स’च्या उद्रेकानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेतला. दिल्लीतील ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण ३४ वर्षांचा असून, त्याने अलीकडे कुठेही परदेश प्रवास केलेला नाही. मात्र, तो हिमाचल प्रदेशात मनालीमध्ये नुकत्याच झालेल्या ‘बॅचलर पार्टी’ला उपस्थित होता. त्याला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले.  

तीन दिवसांपूर्वी त्याच्यात ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे दिसू लागली होती. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे या रुग्णाचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात त्याला ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना शोधून त्यांना आरोग्य मंत्रालयाच्या निकषांनुसार विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संसर्गाचे मूळ कारण शोधणे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा व्यापक स्तरावर शोध घेऊन, त्यांची तपासणी-विलगीकरण, खासगी वैद्यकीय तज्ज्ञांची तपासणी आदी उपाय तातडीने केले जात आहेत. आरोग्य विभाग महासंचालनालयातर्फे रविवारी या संदर्भात तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने