ब्युरो टीम : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस आहे. अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदा गावाजवळ एक प्रवासी जीप नाल्याच्या पुरात वाहून गेली. त्यात सहा प्रवासी होते. ग्रामीण पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आली आहे.अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. मंगळवारी सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा येथील एका नाल्याच्या पुरात प्रवासी जीप वाहून गेली.त्यात सहा प्रवासी होते.पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने पाण्यातून जीप पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या प्रवाहात जीप वाहून गेली. बचाव पथक घटनास्थळी गेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा