भारताने दुसऱ्या T२० च्या सामन्यात इंग्लडला नमवले; रोहितीचे T२० मध्ये तीनशे चौकार


  ब्युरो टीम: भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. हिटमॅनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज बनला आहे. रोहितच्या आधी आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने ही कामगिरी केली आहे.

       भारतीय कर्णधाराने एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात हा टप्पा गाठला. त्याने डावात दुसरा चौकार मारताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले. कालच्या सामन्यात त्याने 20 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि दोन षटकार मारत 31 धावा केल्या.

      भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही याच विक्रमाच्या जवळ होता. मात्र या सामन्यात त्याला केवळ एकच धाव करता आली. हा विक्रम त्याला करता आला नाही. यावेळी कोहलीच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 298 चौकार आहे. कोहली तब्बल पाच महिन्यांनंतर टी-20 संघात परतला आहे. विराट कोहलीसाठी या सामन्यात धावा करणे अत्यंत महत्त्वाचे होते कारण तो बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करत होता. कोहली आणि रोहितला रिचर्ड ग्लीसनने बाद केले. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

       दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा सलग चौथा टी-20I मालिका विजय आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने तीन तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने