पहिला T २० सामन्यात भारताने इंग्लड ला नमवत जागतिक क्रमवारीत मिळवले पहिले स्थान

 


ब्युरो टीम: भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. साउथम्पटन येथील द रोझ बाउलमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि २० ओव्हरमध्ये ८ बाद १९८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला १९.३ ओव्हरमध्ये सर्वबाद १४८ धावा एवढीच मजल मारता आली. भारताने पहिली टी २० मॅच ५० धावांनी जिंकली. हार्दिक पांड्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने ५१ धावा केल्या.                     
संक्षिप्त धावफलक : 
भारत : २० ओव्हरमध्ये ८ बाद १९८ धावा. रोहित शर्मा (२४ धावा), ईशान किशन (८ धावा), दीपक हूडा (३३ धावा), सुर्यकुमार यादव (३९ धावा), हार्दिक पांड्या (५१ धावा), अक्षर पटेल (१७ धावा), दिनेश कार्तिक (विकेटकीपर) (११ धावा), हर्षल पटेल (३ धावा, धावचीत), भुवनेश्वर कुमार (नाबाद १ धावा), अर्शदीप सिंह (नाबाद २ धावा), अवांतर (९). इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अली प्रत्येकी २ तर आर. टोप्ले, मॅथ्यू पार्किनसन्स आणि टी. मिल्स प्रत्येकी १ विकेट.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने