आशिया चषक
स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या
सामन्याचे वैशिष्ट्य ठरले ती हार्दिक पंंड्याची अष्टपैलू कामगिरी. हा विजय मिळवून भारताने 10 महिन्यांपूर्वीच्या पराभवाची परतफेड केली.
भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला
फलंदाजीसाठी पाचारण केले. पाकिस्तानचा डाव 19.5 षटकांत 147 धावांवर आटोपला.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 (42 चेंडू) धावा केल्या. तर, इफ्तिखार अहमदने 22 चेंडूत 28 धावा केल्या. तर
भारताच्या भुवनेश्वर कुमारने 26 धावांमध्ये चार
गडी बाद केले. तर, हार्दिक
पांड्याने 25 धावांमध्ये तीन गड्यांना
तंबूत पाठविले.
भारतासमोर विजयासाठी 148 धावांचे आव्हान होते. या आव्हानांचे पाठलाग
करताना सुरुवातच अडखळतच झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलमावीर लोकेश
राहुल बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानात होती.
त्यांचा अनुभव लक्षात घेता मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण रोहित शर्माला सुरू
गवसत नव्हता. त्याने 18 चेंडूंत 12 धावा केल्या. दुसरीकडे, विराट आक्रमक खेळी करत होता. पण रोहितपाठोपाठ तोही तंबूत
परतला. त्याने 34 चेंडूंत 35 धावा केल्या.
त्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक
पंड्या यांची जोडी जमली. त्यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या समीप नेले.
पण शेवटच्या षटकांतील पहिल्या चेंडूवर जडेजा बाद झाला. त्याने 29 चेंडूत 35 (2 चौकार, 2 षटकार) धावा
केल्या. त्यांनी 52 धावांची
भागीदारी केली. त्यानंतर शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर पंड्याने विजयी षटकार
लगावला. त्याने चार चौकार आणि एक षटकारासह 33 धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक 'प्लेअर ऑफ दी मॅच' ठरला.
भारताचा सलग चौथा विजय
आशिया चषक स्पर्धेत भारताने सलग
चौथ्यांदा पाकिस्तानला नमवले आहे. 2016मध्ये भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव
केला होता. त्यानंतर 2018मध्ये पहिल्या
सामन्यात 8 गडी राखून तर, दुसऱ्या सामन्यात 9 गडी राखून पराभूत केले होते.
तर, 2021मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.
त्याचा वचपा भारताने आजच्या विजयाने काढला. याच मैदानात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता.
टिप्पणी पोस्ट करा