राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार पुढील योगदानासाठी प्रदान केले जातात, राष्ट्रीय बौद्धिक संपदा (IP) पुरस्कार 2021-2022 आणि जागतिक बौद्धिक संपदा संस्था (WIPO) पुरस्कारांसाठी पुढील विविध श्रेणींमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत.
1. व्यक्ती, कंपन्या, संशोधन आणि विकास(R and D) संस्था, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट अप्स आणि संस्था यांना बौद्धिक संपदा निर्मितीसाठी आणि बौद्धिक संपदा व्यावसायिकीकरणासाठी दिलेल्या योगदानाकरिता ज्याद्वारे नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला चालना देणारी राष्ट्रीय बौद्धिक संपदा परिसंस्था निर्माण होण्यात आणि देशाचे बौद्धिक भांडवल वृद्धिंगत होण्यात योगदान मिळाले आहे.
2. बौद्धिक संपदा कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि सशक्त बौद्धिक संपदा विषयक पूरक व्यवस्था तयार करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था.
अर्जदारांनी आपला तपशील https://ipindia.gov.in/newsdetail.htm?816/ वर विहित नमुन्यात उपलब्ध असलेल्या अर्जाद्वारे 31/08/2022 रोजी किंवा त्यापूर्वी विचारार्थ सादर करणे आवश्यक आहे. अर्ज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ipawards.ipo@gov.in या ई-मेल पत्त्यावर आणि टपालाद्वारे पुढील पत्त्यावर पाठवता येतील - डॉ. सुनीता बेटगेरी, पेटंटस आणि डिझाइन सहाय्यक नियंत्रक, बौद्धिक संपदा भवन, एसएम रोड, अँटॉप हिल, मुंबई-400037 (दूरध्वनी क्रमांक :022-24144127)
उल्लेखनीय म्हणजे, हे पुरस्कार 2009 पासून दिले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र असे आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर 2022 रोजी पेटंटस, डिझाईन आणि ट्रेडमार्कस महानियंत्रक कार्यालयाद्वारे आयोजित कार्यक्रमात वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.
|
टिप्पणी पोस्ट करा