स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 च्या अंतिम फेरी, 25 ऑगस्ट रोजी.

     


गेले अनेक वर्षे हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहे. हॅकेथॉन ला पहिल्या वेळी  7500  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी पाचव्या आवृत्तीच्या वेळी मात्रही संख्या सुमारे 29,600  पर्यंत वाढली आहेहे या लोकप्रियतेचेच द्योतक आहे.       

    देशांतविशेषत: युवा पिढीच्या मनात अभिनव संशोधनवृत्ती रुजवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. हाच विचार पुढे नेत2017 साली भारतात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) ची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना समाजसंघटना आणि सरकारच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एक राष्ट्रव्यापी उपक्रम म्हणून स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये उत्पादननांविषयी अभिनव कल्पकतानावीन्य रुजणे समस्या सोडवणे आणि चौकटीबाहेरच्या विचारांना चालना देणारी संस्कृती रुजवणे हा या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचा उद्देश आहे.

     यावर्षी,  या महाअंतिम फेरीचा भाग म्हणून 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि मार्गदर्शक 75 नोडल केंद्रात जाऊन या स्पर्धेत सहभागी होतील. 2900 शाळांचे तसेच 2200 उच्चशिक्षण संस्थांचे विद्यार्थी 53 केंद्रीय मंत्रालयांच्या 476 समस्यांवर उपाययोजना शोधणार आहेत. यात, मंदिरातील शिलालेख आणि देवनागरी लिपींमधील भाषांतरांचे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR), नाशवंत खाद्यपदार्थांसाठी शीत पुरवठा साखळीमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज-सक्षम जोखीम निरीक्षण प्रणालीभूप्रदेशाचे उच्च-रिझोल्यूशन 3मॉडेलआपत्तीग्रस्त भागात पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची परिस्थिती इत्यादी सुविधा असणार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने