455 कोटी रुपयांच्या बनावट वस्तू आणि सेवा कर (CGST)पावत्या बनवणाऱ्या टोळीचा छडा

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर प्रधान आयुक्त कार्यालय आणि उत्पादन शुल्क (अबकारी कर), मुंबई दक्षिण (Principal Commissioner of CGST and CX, Mumbai South) यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी बनावट जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे. या टोळीने 455 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा उपयोग करून 27.59 कोटी रुपये बनावट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी केला होता. या प्रकरणात मे. एमी इंटरनॅशनल जर्नल (OPC) प्रायव्हेट लिमिटेडच्या (Ammy International Journal (OPC) Private Limited) संचालकाला अटक करण्यात आली आहे.
           एका स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने या आस्थापनेविरुद्ध तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळून आले की, करदाता नोंदणीकृत ठिकाणी व्यवसाय करत नव्हता. या आस्थापनाने 14.15 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांच्या नावे 13.44 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट वळवले होते. तपासात असे आढळून आले कि आरोपींनी सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून, मालाचा प्रत्यक्ष पुरवठा किंवा पावती न देता फसव्या पद्धतीने, अस्वीकार्य इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी 455 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जारी केल्या होत्या.
           तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे आणि या कर फसवणुकीतील त्याच्या कबुलीनुसार, आरोपी व्यक्तीला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 10.08.2022 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी,एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
           2021-22 या आर्थिक वर्षात, सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाने 949 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कर चुकवेगिरीचा छडा लावला असुन 18 कोटी रुपयांची वसुली केली आणि 9 करचोरी करणाऱ्यांना अटक केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने