ब्युरो टीम: शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात 5 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील 8 आणि एकनाथ शिंदे गटातील 7 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व कामकाज पाहत आहेत. दोघे जण सर्व कारभार पाहत असल्याने एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे, अशी ही टीका विरोधकांनी केली आहे.
शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे 751 सरकारी आदेश जारी केले असून त्यापैकी 100 हून अधिक आदेश हे एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत.
यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता
भाजप
गुजरातमध्ये पहिल्यावेळेस निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आल्याने तसे झाले तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, संजय कुटे, विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, डॉ. रणजित पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा.राम शिंदे, मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. या व्यतिरिक्त चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना संधी मिळू शकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
शिंदे गट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदीपान भुमरे, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अपक्ष राज्यमंत्री राजेंद्र यड्ड्रावार, आणि बच्चू कडू यांनी मंत्रिपदावर असताना शिंदेंना पाठिंबा दिला. यांच्यासह 5 तारखेला पहिल्या 8 आमदारांमध्ये संजय शिरसाट, यांना देखील संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा