भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा लागू , केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा



ब्युरो टीम
: भारतात  जगातील दुसरे सर्वात मोठे वायरलेस मार्केट   आहे. जगभरातील विविध देशात 5G नेटवर्क उपलब्ध असून भारतात देखील लवकरच 5G नेटवर्क सुरू करणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यावर शिक्कामोर्तब केला आहे. ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, अशी अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. भारतीय यूजर्स 5G  सर्विसच्या प्रतिक्षेत आहे. पण  भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असुन आता भारतात 5G  इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशात 5G  स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडत आहे. या लिलावात देशातील मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या सहभागी झालेल्या आहेत.

            अनेक कंपन्या भारतात 5G  स्मार्टफोन लाँच करत आहेत. 5G  मुळे इंटरनेट स्पीड  मेगाबाइटवरून गीगाबाइटवर  पोहचेल. यामध्ये 4G च्या तुलनेत 100 पट अधिक इंटरनेट स्पीड मिळेल. 5G  टेक्नोलॉजीचा वापर केवळ स्मार्टफोनपुरता मर्यादित राहणार नाही  तर घरातील स्मार्ट इलेक्ट्रीकल उपकरणदेखील तुम्हाला 5G  ला कनेक्ट करता येतील. याशिवाय सार्वजनिक बाबी  म्हणजे हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था  , रेल्वे स्थानकयासंबंधीत व्यवहार देखील अगदी सहज पध्दतीने करता येतील. 

       जगातील सध्या 34 देश 5G  सेवेचा वापर करतात. यात चीन  अमेरिका फिलीपाईन्स, साउथ कोरिया, कॅनडा , स्पेन , इटली , जर्मनी , युके , सउदी अरेबीया या सारख्या देशांचा समावेश आहे. भारतात 5G  सर्विस सुरु झाल्यास भारत जगातील 35 देश असेल जिथे 5G  चा वापर करण्यात येईल. 5G ची उत्सुकता संपूर्ण भारतीयांना लागली आहे.  तरी ऑक्टोबर म्हणजे अवघ्या दोन महिन्यांनंतर भारतीयांना 5G  सेवेचा लाभ घेता येणार आहे.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने