अष्टपैलू खेळाडू रसेलचे सलग 6 षटकार


 


 वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार फटकावण्याची कामगिरी केली आहे. येथे सुरू असलेल्या द सिक्‍टी स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली आहेत्याने त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना सेंट किट्‌स अँड नेव्हिस पॅट्रियट्‌सविरुद्ध 72 धावांची खेळी केली.

     हे सहा षटकार एकाच गोलंदाजाच्या एकाच षटकातआले नसून दोन गोलंदाजांच्या षटकांत फटकावले गेले. रसेलने प्रथम डॉमिनिक ड्रेक्‍सविरुद्ध अखेरच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले तर त्यानंतर जॉन रस जग्सरच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले.

       या खेळीत रसेलने अवघ्या 24 चेंडूत 72 धावा केल्या. त्यात 5 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. रसेलच्या खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने 10 षटकांत 155 धावा केल्या.   विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किट्‌स अँड नेव्हिस पॅट्रियट्‌स संघाला 4 बाद 152 धावाच करता आल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने