नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7 वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी.

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, राज्यांनी गतिमान , लवचिक आणि आत्मनिर्भर असण्याची आणि सहकारी संघराज्याच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारत'कडे वाटचाल करण्याची प्रबळ गरज आहे. एक स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्याच्या दिशेने,नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7 वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली असून ही बैठक केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश दरम्यानचे सहयोग आणि सहकार्याच्या नवीन युगाच्या दिशेने समन्वयाचा मार्ग मोकळा करेल.
           नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र, येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषदेची सातवी बैठक होणार आहे. पीक विविधता आणि तेलबिया आणि कडधान्यांच्या बाबतीत तसेच कृषी समुदायांमध्ये आत्मनिर्भरता ;राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी – शालेय शिक्षण;राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी – उच्च शिक्षण; आणि शहरी प्रशासन या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
           बैठकीच्या तयारीचा एक भाग म्हणून, जून 2022 मध्ये धर्मशाला येथे मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत केंद्र आणि राज्यांनी केलेल्या काटेकोर अभ्यासानंतर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव उपस्थित होते. नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीत वरील प्रत्येक संकल्पनेवर आधारित फलदायी ठरेल अशा पथदर्शी कृती आराखड्याला अंतिम रूप दिले जाईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने