यंदाचा शौर्य पुरस्कार जाहीर; नाईक देवेंद्र प्रताप सिंग यांना कीर्ती चक्र, 8 जवानांना शौर्य चक्र; लष्कराच्या श्वानाचा मरणोत्तर सन्मान

ब्युरो टीम: केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. या स्वातंत्र्यदिनी, नाईक देवेंद्र प्रताप सिंग यांना कीर्ती चक्र, हा देशातील दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाईक देवेंद्र प्रताप सिंग या वर्षी 29 जानेवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या ऑपरेशनचा भाग होते, तिथे त्यांनी आपले शौर्य दाखवले आणि दोन दहशतवाद्यांना ठार केले.
या वीरांना सुद्धा शौर्यचक्र
       याशिवाय लष्करातील 8 जवानांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. यापैकी शिपाई करण वीर सिंग, गनर जसबीर सिंग यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय शौर्य चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये मेजर नितीन धानिया, अमित दहिया, संदीप कुमार, अभिषेक सिंग, हवालदार घनश्याम आणि लान्स नाईक राघवेंद्र सिंग यांचा समावेश आहे.
श्वान अ‌ॅक्सेलला शौर्य पुरस्कार
      भारतीय लष्कराच्या अ‌ॅक्सेल (बेल्जियन मालिनॉइस डाॅग) या लढावू श्वानाला मरणोत्तर 'मेन्शन इन डिस्पॅच' हा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील बंडखोरीविरोधी कारवाईत श्वानाच्या भूमिकेसाठी गेल्या महिन्यात हा पुरस्कार देण्यात आला होता.
       लष्कराच्या अ‍ॅसॉल्ट डॉग अ‌ॅक्सेलला मरणोत्तर शौर्य पुरस्कार 'मेन्शन इन डिस्पॅचेस' प्रदान करण्यात आला.
लष्कराच्या अ‍ॅसॉल्ट डॉग अ‌ॅक्सेलला मरणोत्तर शौर्य पुरस्कार 'मेन्शन इन डिस्पॅचेस' प्रदान करण्यात आला.
31 जुलै रोजी, बारामुल्लाच्या वानीगाम येथे, जेव्हा भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. त्यात श्वानपथकाचाही त्यात समावेश करण्यात आला.
      श्वान अ‌ॅक्सेलच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवण्यात आला होता, जेणेकरुन त्याने केलेल्या कक्षातील हस्तक्षेपादरम्यान दहशतवाद्यांची अचूक माहिती लष्करापर्यंत पोहोचू शकेल आणि ते सहजपणे ऑपरेशन करू शकतील.
       चकमकीच्या ठिकाणी अ‌ॅक्सेल घरात घुसताच दहशतवाद्यांनी त्यावर गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्याने त्याला जीव गमवावा लागला. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हल्ला करणाऱ्या श्वानाला विशेष प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून तो संशयिताला पकडू शकेल.
गोळी लागल्यावरही एक्सलने लढा दिला
         अ‌ॅक्सेलमुळे दहशवादी लपलेल्या एका खोलीची पाहणी आणि लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे टेहळणी झाली होती, मात्र दुसऱ्या खोलीत प्रवेश करताच दहशतवाद्याने त्याच्यावर गोळीबार केला. गोळीचा आवाज ऐकून जवान सावध झाले आणि त्यांनी खोलीत लपलेल्या दहशतवाद्याला ठार केले, मात्र गोळी लागल्याने अ‌ॅक्सेलचाही मृत्यू झाला.
       अ‌ॅक्सेलच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, त्याला गोळ्या लागल्या तसेच दहा वेगवेगळ्या जखमा झाल्या. म्हणजेच गोळी लागल्यावरही अ‌ॅक्सेलने दहशतवाद्याशी सामना केला होता, त्यामुळे त्याला या जखमा झाल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने